breaking-newsताज्या घडामोडी

लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शूटिंग रद्द

मुंबई | कोरोना व्हायरसचा फटका सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना बसला आहे. आता याच कोरोनाचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसणार आहे. कारण १९ मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत सिनेमा, टीव्ही मालिका आणि वेब सीरीज यांचं शूटिंग बंद राहणार आहे. याचा फटका बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा लाल सिंह चड्ढावरही झाला आहे.

याआधी बातमी समोर आली होती की, कोरोना व्हायरस असला तरी आमिर खाननं लाल सिंह चड्ढा सिनेमाची शूटिंग जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता असं म्हटलं जात आहे की, सिनेमाचा मोठा भाग रीयल लोकेशनवर शूट केलं जाणार होतं. यासाठी सिनेमाचं पुढचं शेड्युल पुढे ढकलण्यात आलं. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.

एका पोर्टलनुसार, 12 दिवसांसाठी सर्व शूटिंग थांबवण्याचा आदेश आल्यानंतर काही तासानंतर लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शूटिंग होल्डवर टाकण्यात आलं आहे. आमिर आधीपासूनच शूटिंग रद्द करण्यावर चर्चा करत होता. त्यासाठी करिना पुन्हा मुंबईला आली होती. आता आमिर सुद्धा आज पंजाबहून मुंबई परतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button