लखनऊत नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-3.png)
लखनऊ | महाईन्यूज |
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. लखनऊमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. हिंसाचार सुरु असताना पोलीस चौकीला आग लावण्यात आली असून, बाहेर उभी असलेली अनके वाहनं पेटवण्यात आली. आंदोलकांनी लखनऊमधील डालीगंज आणि हजरतगंज परिसरात हिंसाचार केला. परिसरात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रृधुराचा वापरही करण्यात आलीये..
यावेळी काही आंदोलकांनी मीडियाच्या ओबी व्हॅनलाही आग लावण्यात आली. दुसरीकडे संभल येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. लखनऊमधील डालीगंज परिसरात आंदोलकाकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. हिंसाचार सुरु असल्याने पोलिसांकडून ठाकुरगंज येथे गोळीबार करण्यात आला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी पोलीस चौकीला लक्ष्य करत मदेयगंज नंतर ठाकुरगंज येथील सतखंडा पोलीस चौकीला आग लावण्यात आली. यावेळी चौकीबाहेर उभ्या वाहनांना पेटवण्यात आलं.लखनऊत समजवादी पक्ष आणि काँग्रेसचे नेते आंदोलन करताना विधानसभेच्या मुख्य गेवटर चढले होते. पोलिसांची त्यांना तेथून खाली उरतवताना चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासहित अनेकांना ताब्यात घेतलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव काही मेट्रो स्टेशन्सही बंद ठेवण्यात आले.