breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी सेल

नवी दिल्ली – जर तुम्हाला मागच्या सेलमध्ये Redmi 9 Prime आणि Redmi Note 9 ला खरेदी करण्याची संधी मिळाली नसली तर आज पुन्हा एकदा ही संधी आहे. या दोन्ही रेडमीच्या फोनचा आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर सेल आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. दोन्ही स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.

रेडमी ९ प्राईमचे वैशिष्ट्ये
रेडमी ९ प्राईम स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी रिझॉल्यूशन(1080×2340 पिक्सल) वाला IPS डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी 13MP + 8MP + 5MP + 2MP चा क्वाड रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,020mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन, वॉटरड्रॉप नॉच, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे.

रेडमी नोट ९ चे वैशिष्ट्ये
रेडमी नोट ९ स्मार्टफोनमध्ये 6.53 इंच का HD+ रेजॉलूशन ( 1080×2340) चा डिस्प्ले आणि मीडिया टेक हीलियो G85 SoC प्रोसेसर दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh बॅटरी दिली आहे. २२.५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते.

फोनची किंमत
रेडमी ९ प्राईम दोन व्हेरियंट मध्ये येते. 4GB + 64GB मॉडलची किंमत ९९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडल ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन चार कलर मॅट ब्लॅक, मिंट, ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराईज फ्लेर मध्ये येतो. रेडमी नोट ९ स्मार्टफोनचा 4GB + 64GB मॉडल ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडलची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन अॅक्वा ग्रीन, अॅक्वा व्हाइट, पेबल ग्रे आणि स्कार्लेट रेड कलर ऑप्शनमध्ये येतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button