राष्ट्रपतींनी याचिका फेटाळल्यानंतर निर्भया दोषी मुकेश सिंहची सुप्रीम कोर्टात धाव…
दिल्ली | महाईन्यूज |
निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणात राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आलेल्या दया याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. चार दोषींपैकी एक मुकेश सिंहची याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयात यावर २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे…
गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे दया याचिका फेटाळल्यानंतर ती फाईल दिल्ली सरकारकडे पाठवली आहे. मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्याबरोबरच ती फेटाळल्याची शिफारसही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली होती. यावर अंमलबजावणी करताना राष्ट्रपतींकडून ही याचिका फेटाळण्यात आली आहे…
काही दिवसांपूर्वी दोषी मुकेश सिंह यांनी तिहार तुरुंग प्रशासनाकडे दया याचिका दिली होती. ही याचिका राष्ट्रपतींकडे तिहार प्रशासनाच्या माध्यमातून दिल्ली सरकार नंतर राज्यपाल आणि पुन्हा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राष्ट्रपतींकडे पोहोचली होती.