breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यात करोनाचे १५० नवे रुग्ण; एकूण संख्या १०१८वर

मुंबई | करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारची चिंतेतही भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात १५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत ११६ रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता हजाराच्या वर पोहोचला आहे. दिवसभरात राज्यातील १५० जणांचे चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button