breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यातील ५४ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहेत. देशातील १०४० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील ५४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगिरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत.

देशातील चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, २८६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहेत. विशिष्ठ सेवा पदकः अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहाय्यक पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) ,

शौर्य पदकः मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी (आयपीएस) , समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे

पोलिस पदकः धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक (समन्वयक, दहशतवाद विरोधी पथक, इंटरपोल, सिंगापूर)

महेश साबळे- सर्वोत्तम जीवन रक्षक पदक

जीवन रक्षक पदकः के आर कार्तिकेयन, कु प्रमोद बाळासाहेब देवडे, शिवराज भंडारवड, दत्तात्रय टेंगळे.

७ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहेः प्रभात रहांगडले, राजेंद्र चौधरी, रवींद्र अंबुळगेकर, मिलिंद दोंदे, अभिजित सावंत, सुधीर वर्तक, दिलीप पालव.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button