‘राज्यांनी वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे वेतन वेळेत द्यावे’- सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र , कर्नाटक , पंजाब आणि त्रिपूरा राज्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोरोना व्हायरस संकट काळात या राज्यांनी वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे वेतन वेळेत दिले नाहीयेत. राज्य सरकारनं यापुढे हे वेतन वेळेत द्यावे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांवर ताशेरे ओढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं डॉक्टरांकडून क्वारंटाईन काळ सुट्टी प्रमाणे साजरा करण्यावरही नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना अशा प्रकारे सुट्टी घोषीत करुन त्यांचे वेतन कपात करता येणार नाही म्हणत याकडेही न्यायालयाने लक्ष वेधलं आहे.
राज्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, डॉक्टरांचे वेतन वेळेत दिले जाईल याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्रिपूरा, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये चाचणी, तपासणी आणि इतर आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वेळेत सुट्टी देण्यात यावी. त्यासोबतच योग्य वेळी वेतन आणि आवश्यकतेनुसार भत्ताही देण्यात यावा. राज्य सरकारांनी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. केंद्र सरकार या बाबती असाहय नाही. केंद्र कारवाईही करु शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.