Breaking-newsताज्या घडामोडी
येडियुरप्पा यांनी दिला खासदारकीचा राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/yedurppa-.jpg)
नवी दिल्ली – बी.एस.येडियुरप्पा आणि बी.श्रीरामूलू यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज दोघांचेही राजीनामे स्वीकारले. लोकसभेत येडियुरप्पा शिमोगा तर श्रीरामूलू बेल्लारी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही नेते विधानसभेवर निवडूून गेले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे राजीनामे महाजन यांच्याकडे सुपूर्द केले.
कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र, बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात अपयश आल्याने त्यांनी तीन दिवसांच्या आत 19 मे यादिवशी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कर्नाटकमध्ये आता जेडीएस आणि कॉंग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे.