मार्क रुफॅलोने ट्रम्पविरोधात केले वक्तव्य
महाईन्यूज डेस्क | ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’चा हल्क, अभिनेता मार्क रुफॅलोने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जनतेचा सर्वात मोठा शत्रू म्हणून वर्णन केले आहे. मार्कने ट्रम्पविरोधी विरोधात सहभागी असलेल्यांना तोडफोड करण्याचे आवाहन केले.
मार्क सध्या त्याच्या आगामी ‘डार्क वॉटर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अॅव्हेंजर्स एंडगेम या हिट चित्रपटात ब्रूस बॅनर आणि हल्कची भूमिका साकारणारा मार्क ‘द लास्ट बिग थिंग’, ‘यू कॅन काउंट ऑन मीट’, ‘इटर्नल सनशाईन ऑफ ए स्पॉटलेस माइंड’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.
2016 मध्ये ‘स्पॉटलाइट’, ऑक्टोबर 2015 मध्ये ‘फॉक्सकॅचर’ आणि 2011 मध्ये ‘द किड्स आर ऑल राइट’ या चित्रपटातील भूमिकांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता या श्रेणीत ऑस्कर नामांकने मिळाली आहेत.
इंग्रजी वेबसाइट ‘aceshowbiz’ च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मार्क निडरपणे लिहितोय. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्काय न्यूजला पोहोचलेला मार्क म्हणाला की, ट्रम्प यांच्यापेक्षा जगात मोठी समस्या नाही. अभिनेता म्हणाला, माझ्या म्हणण्यानुसार माझा राष्ट्रपती हा लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच वेळी त्याने क्लायमेट अक्टिविस्ट ग्रेटा थनबर्गला नायक म्हटले आणि प्रोटेस्ट ग्रुप एक्सिटिंशन रिबेलियन ग्रुपचे कौतुक केले.