breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मायकल जॉर्डन सामाजिक न्यायासाठी 755 कोटी रुपये दान करणार

स्टार बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन सामाजिक न्याय आणि वर्णभेदाविरोधात लढत असलेल्या संघटनांना 100 मिलियन डॉलर (अंदाजे 755 कोटी) रुपेय दान करणार आहे. जॉर्डन आणि त्याचा ब्रँड या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना पुढील 10 वर्षांपर्यंत फंडींग करणार आहे. हे डोनेशन फेसबुक आणि अॅमेझनॉने केलेल्या दानापेक्षा 10 पट जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना 10 मिलियन डॉलर (अंदाजे 75 कोटी रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे.

जॉर्डनने ही घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर देशभरात आंदोलन पेटले.जॉर्डन आणि त्याच्या ब्रँडने एक निवेदन जारी करत म्हटले की, कृष्णवर्णय व्यक्तीच्या आयुष्याचीही किंमत असते. जोपर्यंत देशातून वर्णभेद नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही कृष्णवर्णीयांच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढत राहणार.

ब्रँड जॉर्डनचे प्रेसिडेंट क्रेग विलियम्सने म्हटले की, कृष्णवर्णीय समाजाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे. आम्ही याची जबाबदारी घेऊ.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button