breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

नवी दिल्ली | गेल्या सहा वर्षांपासून कोमात असलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. २०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते.

जसवंत सिंह यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. जसवंत सिंह यांनी आधी लष्करात आणि त्यानंतर राजकारणात राहून देशाची परिश्रमपूर्वक सेवा केली. अटलजींच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबादारी होती. त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button