महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी लाँच होणार
नवी दिल्ली | देशाची दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा नवीन इलेक्ट्रिक कार eKUV100 भारतात लाँच करण्याची तयारी करीत आहे. देशात करोना व्हायरसच्या संकटामुळे या कारची लाँचिंग आता पुढे ढकलावी लागत आहे. या कारच्या लाँचिंगच्या तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारला २०२० पर्यंत भारतात लाँच करण्यात येणार होते.
परंतु, आता २०२१ मध्ये ही कार लाँच करण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीने या कारला ऑटो एक्स्पो २०२० मध्ये आणले होते. कंपनीने या कारच्या लाँचिंगची घोषणा सुद्धा केली होती. या कारची किंमत ८.२५ लाख रुपये (एक्स शोरुम इंडिया) आहे. या किंमतीत सध्या देशातील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.या मिनी इलेक्ट्रिक कार एसयूव्हीमध्ये ४० किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जे ५३ बीएचपी आणि १२० एनएम टॉर्क जनरेट करते. ईकेयूव्ही १०० मध्ये १५.९ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
ही इलेक्ट्रिक कार फुल चार्ज झाल्यानंतर १३० ते १५० किलोमीटर अंतर कापते. स्टँडर्ड चार्जरने ही कार ५ तास ४५ मिनिटात फुल चार्ज होऊ शकते. फास्ट चार्जरने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ५५ मिनिटात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.