Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
![Supreme court warns Central Government over Farmers protest and Farm bill](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Supreme_Court.jpg)
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महत्त्वाचे म्हणजे सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना ‘तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का’, असा सवाल करत फटकारले.
याचिकाकर्त्यांनी केवळ मुंबईतील घटनांचा उल्लेख करून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली होती. ही याचिका आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल’, असे खडेबोल सरन्यायाधीशांनी सुनावले.