मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे – उदयनराजे भोसले
![The state government should first clarify its role, then decide who will lead the movement - Udayan Raje Bhosale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Udyanraje-Bhosale-1-300x200-1.jpg)
सातारा – भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं परखड मत मांडलं आहे. मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची खंतही उदयनराजे यांनी बोलून दाखवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जात-पात मानली नाही, मी स्वतःला कधीही मराठा म्हणून समजून घेतलं नाही. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.” उदयनराजे सातारा पालिकेच्या आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली, तिच शिकवण आजही अमलात आणली पाहिजे असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
जात-पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातीचं आरक्षण काढून घेऊ नका. आर्थिक स्तरावर केंद्र शासनाने व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे त्याचाही विचार व्हायला काय हरकत आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटना व कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारले तर कोणीही बोलत नाही. मला या विविध संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम दिसून आल्याचं परखड मत उदयनराजेंनी बोलून दाखवलं आहे.