breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ममता बॅनर्जींना मोठा झटका! तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला एकामागून एक हादरे बसत आहेत. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता तृणमूलच्या आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे. दिल्लीत या नेत्यांचा भाजपाप्रवेश पार पडला. त्यामुळे ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसला आहे.

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, हावडाचे माजी निगम अध्यक्ष राथिन चक्रवर्ती आणि अभिनेता रुद्रनील घोष यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी शनिवारी अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाबाबत स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

अमित शाह म्हणाले, ‘तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील’, असे शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.तर भाजपात प्रवेश करणाऱ्या पाच नेत्यांनी सांगितले की, ‘बंगालमध्ये यावेळी खूप अत्याचार होत आहे. तिकडची जनता तृणमूल काँग्रेसला हैराण झाली आहे. बंगालच्या विकासासाठी आता भाजपा काम करत आहे.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button