breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय सुरक्षा दलाने अनंतनागमध्ये तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेदरम्यान आज सकाळी जम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील सिरहमा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु केली. शोध मोहिमेदरम्यान एका घराजवळ पोहोचताच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोघा दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्यांकडून एक एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button