Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारतीयांनी घेतला कोरोना व्हायरसचा धसका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहे बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-164.png)
चीनमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसचा धसका आता भारतीयांनीही घेतला आहे. करोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्यातच आता सिनेमा बघण्यावरही बंधनं आली आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/cinemas.jpg)
केरळमध्ये करोना व्हायरसचे आणखी ६ संशयित आढळले आहेत. त्यामुळे तेथील करोना संशयितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केरळमधील काही मल्याळम सिने संघटनांनी ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोची येथे मल्याळम सिने संघटनांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता केरळमध्ये ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह बंद राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी एकाच व्यक्तीकडून अनेकांना करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. असं घडू नये, याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे केरळच्या सिने संघटनांचे म्हणणे आहे.