भारतासमोर चीनच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे आव्हान
नवी दिल्ली : युरोप आणि अमेरिकेच्या जागतिक वायुवर्चस्वाला आव्हान देण्याचा ध्यास चीनने घेतला आहे. यासाठी तो देश अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तयार करत आहे. याकामी त्याने मोठी आघाडी घेतली असून भारतालाही या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आशिया आणि आशिया प्रशांतीय क्षेत्रातील सामरिक समतोलावर चीनच्या या तांत्रिक प्रगतीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विशेषतः हवेतून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्रंची निर्मिती करण्यावर चीनचा भर आहे. ही क्षेपणास्त्रे लढाऊ विमानांमधून डागता येतात. अचूकता, वेग आणि पल्ला या तिन्ही क्षेत्रांमध्ये ती अजोड असतील अशी काळजी चीन घेत आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. चीनची अर्थव्यवस्था 13 लाख कोटी डॉलर्सची असून ती भारताच्या पाचपट मोठी आहे. शिवाय चीन सरकारजवळ मोठय़ा प्रमाणावर अतिरिक्त धन आहे. त्यामुळे तो देश संरक्षण संशोधनावर मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करू शकतो.