भारतात एका आठवड्यात 2.10 लाख संक्रमित आढळले
![Record of 38 thousand 949 new corona sufferers in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-in-india.jpg)
मुंबई | देशात कोरोना संक्रमितांनी 10 लाखांचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 3 दिवसांत एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 10 लाख 5 हजार 637 पर्यंत गेली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बहुतेक रुग्ण बरे होत आहेत. केवळ गेल्या एका आठवड्यात 2.10 लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली होती, दरम्यान या काळात 1.40 लाखाहून अधिक लोक बरे झाले. अशा परिस्थितीत संक्रमित केसेसची संख्या (अॅक्टिव्ह केस) केवळ 65 हजार 881 इतकी वाढली आहे.
गुरुवारी एका दिवसात विक्रमी 35 हजार 468 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी 32 हजार 607 लोकांना संसर्ग झाली होती. गुरुवारी विक्रमी 22 हजार 834 रूग्ण बरे झाले ही दिलासादायक बाब आहे. हा आजपर्यंतच्या सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी 14 जुलै रोजी 20,968 रूग्ण बरे झाले होते. बरे झालेल्या लोकांची संख्या आता 6 लाख 36 हजार 569 झाली आहे. यासह देशात संक्रमणाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही 25 हजार 609 वर पोहोचली. सध्या देशात 3 लाख 42 हजार 79 लोकांवर उपचार सुरू आहेत.