भाजपची चौथी यादीतूनही तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू
महाई न्यूज |मुंबई |
मेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपने सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना तिकीट न देण्याचा शब्द भाजपने खरा करून दाखवला आहे. मात्र, त्यांचे बंड थोपवण्यासाठी त्यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील बोरीवली, कुलाबा व घाटकोपर पूर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे.
भाजपची चौथी यादी पुढीलप्रमाणे :
बोरीवली – सुनील राणे
घाटकोपर पूर्व – पराग शाह
कुलाबा – राहुल नार्वेकर
तुमसर – प्रदीप पडोळे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
काटोल – चरणसिंग ठाकूर
नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकले