Breaking-newsताज्या घडामोडी
बायडेन जिंकल्यास सुप्रीम कोर्टावर ताबा घेतील : डोनाल्ड ट्रम्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Donald-Trump-1-2-2.jpg)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या जॅक्सनविलेमध्ये जाहीर सभा घेतली. ही सभा विमानतळ भागात झाली. त्यात हजारो लोक सहभागी झाले. ट्रम्प याप्रसंगी म्हणाले, निवडणुकीत घोटाळा होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार बायडेन विजयी झाल्यास ते आणि त्यांचे समर्थक सर्वोच्च न्यायालयावर ताबा मिळवतील, अशी भविष्यवाणी ट्रम्प यांनी केली.त्यांच्या समर्थकांनी कोर्ट बंद करण्याची मागणी केली होती.
दुसरीकडे इतरांना सत्ता सोपवण्याची गरज भासणार नाही, या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण दिले आहे. प्रवक्त्या केली मॅकनॅनी म्हणाल्या, स्वतंत्र व नि:पक्ष निवडणूक झाल्यास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निकाल स्वीकार करतील.