breaking-newsताज्या घडामोडी

बंद असलेली कांदा खरेदी पुन्हा सुरू ,कांद्याच्या दरात कमालीची घसरण…

लॉकडाउनमुळे बंद असलेली कांदा खरेदी पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर बाजार समित्यांमधून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र, कांद्याचे दर कमालीचे कोसळले असून, नगरमध्ये एक नंबर कांद्यास फक्त ७०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

याआधी नगरमध्ये कांद्यास चांगले दर मिळत होते. मागील काही महिन्यांपर्यंत कांद्यास जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यानंतर लॉकडाउनमुळे महिनाभरापासून कांदा खरेदी बंद होती. गुरुवारपासून कांदा खरेदी सुरू करण्यात आली.मात्र कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहे… बाजार समितीत आवकही कमी आहे.

सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे. कांदा साठवण्याचा खर्च जास्त आहे. म्हणून शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणतात. मात्र, लॉकडाउन असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य आणि देशातील मोठ्या शहरांतील बाजार बंद आहेत. अन्य देशात निर्यात सध्या बंद आहे. कांद्यास परराज्यातूनही फारशी मागणी मिळत नाही. त्यामुळे व्यापारी सुद्धा जास्त कांदा खरेदी करत नाहीयेत… किरकोळ बाजारात जेवढी विक्री होईल साधारण तितकाच कांदा खरेदी केला जात आहे. त्यामुळे कांद्याच्या दरावर त्याचा परिणाम होत आहे. कांद्याची आवक कमी झाल्यानंतर सुद्धा भाव मिळत नाहीत. बाजारात सुद्धा भाव मिळत नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button