फ्रान्समधून येणाऱ्या प्रवाशांची रोममध्ये कोरोना चाचणी अनिवार्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Corona-test-hero-a219365.jpg)
रोम – आता फ्रान्सहून परतणाऱ्या प्रवाशांचीही रोममधील विमानतळांवर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रवाशांना ३० मिनिटांची रॅपिड टेस्ट करावी लागणार आहे. आतापर्यंत माल्टा, स्पेन, ग्रीस आणि क्रोएशियातून येणाऱ्या प्रवाशांचीच कोरोना टेस्ट केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांत फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने इटलीने फ्रान्समधील प्रवाशांचीही चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने ऑगस्टपासून फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होऊ लागलाय. फ्रान्सच्या मार्सेली, ग्वाडलूप या भागांना रेड झोन घोषित करण्यात आलाय. त्यामुळे येथील बार आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. पॅरिस आणि लगतच्या भागांतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील बार आणि रेस्टॉरंट रात्री १० नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.