Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करतायेत – पृथ्वीराज चव्हाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/prithviraj-chavhan-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भारतात सध्या अनेक ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत. यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त घोषणा देण्यात येत आहेत.
- देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट…
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ खोटा असल्याचे सांगत काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील भाजपाची सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस निराश झालेले आहेत. सत्य पाहिल्याशिवाय वादग्रस्त व्हिडीओ शेअर करत आहे. त्यांनी आधी व्हिडीओची चौकशी करायला हवी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
- पृथ्वीराज चव्हानांचे ट्वीट…