breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा

गेल्या जवळपास 7 महिन्यांपासून जगभरातील लोक कोरोना व्हायरसशी लढा देत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोनाला रोखण्यासाठी नवं-नवे उपाय, पद्धती सांगितल्या जात आहेत. भारतासह अनेक देशातील संशोधक याच्या बचावासाठी लसीवर काम करत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, फेस कव्हर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, ग्लोव्ज अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जात आहे. अनेक लोक बाहेर पडताना आणि ऑफिसमध्ये काम करताना प्लास्टिक फेस शिल्डचा वापर करत आहेत. परंतु प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचं समोर आलं आहे.

जपानी सुपर कंम्पुटरनुसार,सध्या लोक कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक शिल्डचा चेहऱ्यावर वापर करत आहेत. मात्र हे ऐरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेलं नाही. हे प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकत नसल्याचा, दावा करण्यात आला आहे.

जगातील सर्वात फास्ट कंम्पुटर फुगाकूने कोविड-19 दरम्यान वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक फेस शिल्डचं सिमुलेशन केलं आहे. ज्यात 100 टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स 5 मायक्रोमीटरहून लहान आढळले. जे प्लास्टिक विझार्ड्सद्वारेही वाचू शकतात. त्यामुळे पारदर्शी फेस शिल्डमधून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. एक मीटरच्या दहाव्या लाखाचा भाग मायक्रोमीटर असतो.

रिकेन सेंटर फॉर कंम्पुटर सायनस येथे टीम प्रमुख असणारे मोटो त्सुबोकोरा यांनी सांगितलं की, फेस शिल्ड मास्कला पर्याय म्हणून पाहू नये. तसंच फेस मास्कच्या तुलनेत फेस शिल्ड अतिशय कमी प्रभावी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button