breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रदुषण कमी झाल्याने सीतामढी जिल्ह्यातून हिमालयाच्या पर्वतरांगांचं थेट दर्शन

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं वाढत संकट पाहता लॉकडाऊन हा आता दीड-दोन महिन्यांपर्यंत लांबला आहे. याचा सामान्यांना त्रास होत असला तरीही प्रदुषणाच्या पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. हवा अधिक शुद्ध झाली आहे. त्याचाचं सुंदर अनुभव बिहार मधील सीतामढी जिल्ह्यातील नागरिकांना घेतला आहे… प्रदुषण कमी झाल्याने सीतामढी जिल्ह्यातून हिमालयाच्या पर्वतरांगांचं थेट दर्शन होत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. सीतामढी मधील नागरिकांना माऊंट एव्हरेस्टचं असं दर्शन आणि निसर्गाचा हा अद्भुत नजारा पहिल्यांदाच पहायला मिळाला…

बिहारमधून थेट भारत-नेपाळच्या सीमेवरील हिमालयाचं दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे… अनेकजण हा नजारा फोटोमध्ये टिपत आहेत. सीतामढी पासून नेपाळच्या पहाडी भागामध्ये सुमारे 40-50 किलोमीटरचं अंतर आहे. काही तज्ञांच्या मते वातावरण स्वच्छ असेल तर एखाद्या उंच ठिकाणावरून सहज पर्वतरांगांचं दर्शन होऊ शकतं. सध्या अंदाजे 40% प्रदुषण कमी झालं आहे.

उत्तर प्रदेशमधील अनेक नागरिकांनी हिमालयाच्या पर्वतारांगांचं दर्शन झाल्याचे फोटो सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले होते. उत्तर भारतामध्ये हवेच्या प्रदुषणामध्ये जशी घट झाली आहे. तसंच जल प्रदुषण देखील घटलं आहे. काही दिवसांपूर्वी गंगा नदी प्रदूषणाच्या पातळी घट झाल्याने ऋषिकेश ते लक्ष्मण झुलापर्यंत वाहणार्‍या नदीच्या शुद्ध पाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभिनेत्री दिया मिर्झाने हा व्हिडिओ शेअर केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button