पूनर्विवाहाला नकार दिला म्हणून सासरकडच्यांनी विधवा सुनेचे नाक आणि जीभ कापली
![मोशीत एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/police-crime-scene-murder-do-not-cross-shut.jpg)
जैसलमेर – विधवा सुनेने नातेवाईकासोबत लग्नाला नकार दिल्याने तिचं नाक आणि जीभ कापून टाकली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये हा प्रकार घडला असून हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जखमी महिलेचे सहावर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर वर्षभरातच तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सासरकडची मंडळी तिचे एका नातेवाईकासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. “माझ्या बहिणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीवर हल्ला केला. आरोपींनी माझ्या बहिणीचं नाक आणि जीभ कापली. तिच्या उजव्या हातालाही मार लागला. माझी आई हल्लेखोरांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ती सुद्ध जखमी झाली” असे महिलेच्या भावाने सांगितले. जखमी महिलेवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.