Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पुलवामामध्ये पोलीस व CRPF च्या दलांवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ARMY-SPECIAL-FORCE.jpg)
पुलवामा | पुलवामा भागात पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी आज शुक्रवारी दुपारी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे. सांगितले जात आहे की, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. दोन्ही भागातून फायरिंग सुरू आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसातील एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटीत सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी हल्लेखोरांनी सुरक्षा दलावर अंधाधुंद गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार पुलवामातील प्रिचूमध्ये पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम होती. दहशतवादी अचानक आले व त्यांनी फायरिंग सुरू केली.