breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पुलवामात लष्कराला मोठे यश एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, सुरक्षा दलाने 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा
![Pakistan violates ceasefire in Naushera sector around noon today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Indian_Army_PTI.jpg)
पुलवामा. जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लामध्ये गुरुवारी संध्याकाळपासून एन्काउंटर सुरू झाले होते. दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिक्योरिटी फोर्सेसने शोध मोहिम सुरू केली होती. यापूर्वी गुरुवारी सकाळी बारामूला जिल्ह्याच्या सोपोर परिसरात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात 15 एन्काउंटरमध्ये 44 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना मदत पुरवणाऱ्यांना पकडण्याचे सत्रही सुरू आहे. बडगामच्या नरबल परिसरात बुधवारी आर्मी आणइ पोलिसांनी कारवाई करुन लष्कर-ए-तोयबाच्या 5 मदतनिसांना अटक केली होती. त्यांच्याजवळ एके-47 रायफल, 28 गोळ्या आणि लष्कर-ए-तोयबाचे 20 पोस्टर मिळाले होते.