breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

पिसाळलेल्या श्वानाचा सातजणांना चावा, नागरिकांत भीतीचे वातावरण

कऱ्हाड | महाईन्यूज

कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला आहे. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला होता, यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कऱ्हाड शहरात सध्या मोकाट श्वानांची संख्या चांगलीच वाढली आहे. या श्वानांकडून अनेकवेळा पहाटेच्यावेळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात उत्तरेश्वर वाघमारे, वंदना कृष्णा लोंढे, अनिल नागाप्पा कट्टीमणी, उमेश कोळी, जोत्स्ना जागीरदार, जमीर मुल्ला, महेश कोळी यांच्यावर अचानक पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात उत्तरेश्वर वाघमारे या मुलाच्या डोक्याला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button