breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील लढवय्या महायोद्धा काळाच्या पडद्याआड
भारतीय सैन्य दलाचे माजी लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून यांचे वृद्धापकाळाने निधन
छत्तीसगड, हरियाना। महाईन्यूज । ऑनलाईन टीम
पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात (१९८४) महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय सैन्यदलाचे माजी लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आजारी असल्यामुळे हून यांना दोन दिवसांपूर्वी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हून यांचा जन्म भारताची फाळणी होण्यापूर्वी म्हणजे ४ ऑक्टोबर १९२९ रोजी झाला होता. त्यांनी भारतीय लष्करात भरती झाल्यानंतर ‘ऑपरेशन मेघदूत’ या काश्मिरमधील मोहिमेत सहभाग घेतला होता. या कारवाईमुळे भारतीय सैन्याने संपूर्ण सियाचीन ग्लेशियरवर ताबा मिळविला होता.