Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.४ बिलियन डॉलरचे कर्ज मंजूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/Imran-Khan-1.jpg)
नवी दिल्ली | कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. यामुळे संपूर्ण जगाला आर्थिक संकटचे सावट उभे राहिले आहे. मात्र, पाकिस्तानची याआधीच आर्थिक अवस्था बिकट होतीच. आता कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही खिळखिळीत झाली आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितीली होती.
यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १.४ बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे. पाकिस्ताने गेल्या वर्षी जुलैमध्ये ६ बिलियन डॉलरचे कर्ज घेतले होते. याव्यतिरिक्त आंतराराष्ट्रीय नाणेनिधीकडू कर्जाची मदत देण्यात आली आहे. सध्या स्थिती पाहाता पाकिस्तान बेजार झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये देखील लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्यांच्या देशातील नागरिकांमध्येय उपासमारीची मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.