breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

पदवीधर- शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाला विजयी करा : सत्यजित देशमुख

शिराळा । विनायक नायकवडी

पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे प्रतिपादन भाजपा नेते सत्यजित देशमुख यांनी केले.

शिराळा येथे भारतीय जनता पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक परिषदेचे भाजपा उमेदवार जितेंद्र पवार, भाजपा नेते रणधीर नाईक, जिल्हा परीषद सदस्य संपतराव देशमुख, विश्वास साखर संचालक रणजीतसिंह नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी जि.प. सदस्य के.डी. पाटील, महादेव कदम उपस्थित होते.

सत्यजित देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सुशिक्षित,सक्षम व सर्वसामान्य माणसांची नाळ जोडलेले आहेत.संग्राम देशमुख यांनी सामाजिक, क्रीडा,औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याची धमक त्यांच्यात आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित या सरकारने ठेवले आहेत. शिक्षण क्षेत्राचे सरकारने मोठे नुकसान केलेले आहे. या सरकारला वेळीच रोखण्यासाठी भाजपाला साथ द्या.

 माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की,  लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. दगाबाजी च्या राजकारणामुळे राज्यांमध्ये सत्ता येऊ शकली नाही परंतु भाजप वर झालेला अन्याय जनता या निवडणुकीत दाखवून देईल. शिक्षक व पदवीधर यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही उमेदवारांना विजयी करा असे आव्हान साळुंखे यांनी केले.

शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार म्हणाले, शिक्षण चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यामध्ये शिक्षकांशी कायम संपर्क व संबंध आलेले आहेत. या मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

रणधीर नाईक म्हणाले, भाजपची सत्ता राज्यांमध्ये आली होती परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी जनमताचा अवमान केलेला आहे जनता आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

यावेळी भाजपा शिक्षक सेल जिल्हा अध्यक्ष उत्तम पाटील, नगरसेवक बंडा डांगे, सम्राट शिंदे, अर्जुन कुरणे, महेश पाटील, बाजीराव पाटील,उत्तम निकम, संभाजी पाटील,नामदेव पाटील, रणजीत कदम,जगदीश कदम यांच्यासह पदवीधर,शिक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button