breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी ताजमहालही विकायला मागेपुढे पाहणार नाहीत-राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Rahul-taj-and-modi.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर ते उद्या ताजमहालही विकतील अशी खोचक टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केलेली. “मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. हा नारा चांगलाच प्रसिद्धही झाला आहे. मात्र इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे, लाल किल्ला हे सगळं ते विकायला निघालेले आहेत. एवढंच काय उद्या ते ताजमहालही विकतील.” अशी टीका राहुल गांधी यांनी केलेली आहे.