नेपाळच्या लोकसभेत नवा नकाशा मंजूर
काठमांडू | नेपाळच्या लोकसभेत नव्या नकाशावर मतदान झाले. अपेक्षेप्रमाणे दोन तृतियांश बहुमत मिळवत नकाशाचा प्रस्ताव मंजूर झाला. नियमानुसार मंजूर झालेला प्रस्ताव नेपाळच्या राज्यसभेत म्हणजेच ज्येष्ठांच्या सभागृहात सादर होणार आहे. या सभागृहात प्रस्ताव मंजूर झाल्यास तो राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे. एकीकडे हे राजकारण सुरू असताना नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठ्या संख्येने नेपाळी नागरिक रस्त्यावर येऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.
नेपाळच्या लोकसभेत नकाशा प्रस्तावाच्या बाजूने पडली २५८ मते पडली. सभागृहाची एकूण मते २७५ आहेत. यापैकी २५८ मतांमुळे घटनात्मक दुरुस्तीला नेपाळच्या लोकसभेचा पाठिंबा मिळाला आहे. आता नेपाळच्या राज्यसभेत काय घडते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण आतापर्यंतच्या घडामोडींमुळे भारत-नेपाळ सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.