breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराष्ट्रिय

निष्ठावंत! तब्बल 27 वर्षे चप्पल न घालणारा कोल्हापूरचा कारसेवक, अनोखा पण पूर्णत्वाच्या मार्गावर

कोल्हापूर : देशभरात आज राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह आहे. अयोध्या नगरीत बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपजून सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. अयोध्येपासून देशाच्या कानाकोपऱ्यात रामनामाचा जयघोष होत आहे. इकडे कोल्हापूरमधील एक कारसेवकाचा अनोखा पण पूर्ण होणार आहे. राम मंदिरासाठी तब्बल त्याने 27 वर्षे पायात चप्पल न घालणाऱ्या कोल्हापूरच्या कारसेवकाचा पण आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

कोल्हापूर जवळील शिये गावातील कारसेवक निवास पाटील यांची अनोखी राम भक्ती आहे. आयोध्येत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा त्यांनी संकल्प केलेला होता. तब्बल 27 वर्ष अनवाणी पायाने निवास पाटील फिरत आहेत. मंदिराचा कलश रोहन झाल्यानंतरच पायात चप्पल घालण्याचा त्यांचा निर्धार केलेला आहे. कारसेवक निवास पाटील हे 1992 च्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले होते. त्यांनी आज राम मंदिर भूमिपूजननिमित्ताने घरातच प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेच पूजन केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button