breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भयाच्या दोषींना फाशी; ‘या’ राज्यातून येणार जल्लाद!

नवी दिल्ली | निर्भयाच्या दोषींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. तिहार तुरुंग प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली असून फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमधून दोन जल्लाद मागवण्यात आले आहेत. मेरठ तुरुंगातील पवन जल्लाद असणार असून दुसऱ्या जल्लादाचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशमधील तुरुंग अधिकाऱ्यांना दोन जल्लादांची आवश्यकता असल्याचे पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये निर्भयाच्या दोषींच्या नावे जारी करण्यात आलेल्या डेथ वॉरंटचाही उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन जल्लाद हा प्रशिक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्यामुळे त्याची मुख्य जल्लाद म्हणून मागणी करण्यात आली आहे. पवनला दिल्लीत आणण्यासाठी मेरठला एक टीम जाणार आहे. तुरुंग प्रशासनानेदेखील त्याची सुरक्षा वाढवण्याची मागणी उत्तर प्रदेश सरकारला केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button