breaking-newsताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी 600वर रुग्ण आढळले
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
नाशिक – नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी सहाशेच्यावर नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पंधरा हजार पार गेला आहे.
नाशिक शहरातील सहा जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडादेखील ५०५ वर गेला. तसेच शनिवारी २१७ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. शनिवारी नाशिक शहरात सर्वाधिक ३९७, ग्रामीण भागात १ हजार ७८ तर मालेगावात २८ अशाप्रकारे ६०३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.