Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नागरिक सुधारणा कायद्याच्या निषेधार्त अभिनेता फरहान अख्तर रस्त्यावर उतरणार !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Farhan-1.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
देशाच्या विविध भागात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त होत असताना अभिनेता आणि गायक फरहान अख्तर यांनी बुधवारी जाहीर केले की, आपण उद्या कायद्याच्या विरोधात निदर्शनेत भाग घेत आहोत.
फरहान म्हणाला की, सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ आता संपली आहे, आता रस्त्यावर उतरुन लढाई केली पाहिजे., अशा भावना ‘ट्वीटर’वर व्यक्त केल्या आहेत.
यापूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महेश भट्ट आणि सुशांत सिंह यांच्यासारख्या इतर नामांकित व्यक्तींनीही निषेध नोंदविला होता.