breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला
नागपूर | नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला आहे . एका दिवसात 2300 वर गेलेली रुग्णसंख्या गेल्या 24 तासांत 590 वर आली आहे. त्यामुळे नागपूरमधील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
गेल्या 24 तासात 1650 रुग्ण बरे झाल्याने आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सत्र मात्र सुरुच आहे. 24 तासात जिल्ह्यात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 74 हजार 821 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 58 हजार 266 रुग्ण झाले बरे झाले आहेत.