नागपुरातील सतरंजीपुरा भागातील तब्बल 1200 लोकांना केलं कोरंटाइन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/LwiKsyxF4xGLDKYqBVyFEL-320-80-2.jpg)
नागपूर | नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील तब्बल 1200 वर लोकांना महापालिकेच्या वतीनं रात्री सक्तीनं कोरंटाइन करण्यात आलं. 30 बसेसच्या माध्यमातून सर्वांना कोरोंटाइन सेंटरपर्यंत नेण्यात आलं. त्यामुळं या भागात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या भागातील 68 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या मृत्यु झाल्यावर या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं परिसरातील जवळपास 80 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळं नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करते आहे.
मात्र, अजूनही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब पुढं आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील सुमारे 200 वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्यानं मोठा संसर्ग टळला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या भागातील 1200 जणांना सक्तीनं कोरंटाइन करून ठेवण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली.