breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्याने गदारोळ झाला आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या जगभरातून टीका होतेय. अशात कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. ‘तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही’, असे व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच ‘नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावाही कंपनीने केला आहे. दरम्यान, नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ट्वीटसोबतच आपल्या ब्लॉगची एक लिंकही शेअर केली आहे. पॉलिसीमध्ये झालेला बदल केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खासगी चॅटिंगवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर केली जाणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलंय,

व्हॉट्सअ‍ॅप तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.
– व्हॉट्सअ‍ॅप तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.
– व्हॉट्सअ‍ॅप तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
– व्हॉट्सअ‍ॅप तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.
– व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.
– तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकता.
– तुम्ही तुमचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा डाऊनलोड करु शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button