breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय
नव्या कोरोना स्ट्रेनला भारतात रोखण्यात आले यश
ब्रिटन – ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार भारतातही पोहोचला. मात्र, भारत या नव्या विषाणूच्या संसर्गावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवत आहे. यासाठी आपली आयसोलेशन प्रक्रिया दुसऱ्या देशांपेक्षा जास्त प्रभावी ठरत असल्याचा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केला आहे.
वाचा :-लसीला परवानगी मिळाल्यानंतर मोदींनी दिल्या शुभेच्छा
“संपूर्ण जगभरात कोरोनाचा नव्या प्रकार शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये सातत्याने संशोधन सुरु आहे. ब्रिटनहून भारतात आलेल्या लोकांच्या नमुन्यांमधून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत (एनआयव्ही) शोध घेतला जात आहे. आजवर कोणत्याही देशानं कोरोनाच्या नव्या प्रकारावर यशस्वीरित्या आयसोलेशन सुविधा तयार केलेली नाही. मात्र, भारत यामध्ये यशस्वी झाला आहे”