नवीन वर्षातील इस्रोची पहिली कामगिरी यशस्वी; 18 उपग्रहांचे यशस्वी लॉन्चिंग
![ISRO's first performance in the new year was a success; Successful launch of 18 satellites](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/ISRO.jpg)
नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधील पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. आज सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून हे प्रक्षेपण झाले. इस्रोच्या पीएसएलवी-सी 51ने एकूण 18 उपग्रह लॉन्च केले आहेत. या अभियानांतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटलाही लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे इस्रोने या सॅटेलाइटसोबत भगवद्गीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे.
ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ या उपग्रहाला घेऊन ‘पीएसएलव्ही सी-५१’ (PSLV-C51)अवकाशात जात आहे. त्याशिवाय इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडले जाणार आहे. या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे २५,००० लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवद्गीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले आहे. हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत.
दरम्यान, अमेझोनिया-1 द्वारे पृथ्वीवरील जंगल तोड आणि त्याचे निरीक्षण करतील. अमेझॉनच्या जंगलात नुकतीच आग लागली होती. त्यामुळे ब्राझिलचा हा उपग्रह जंगलाच्या संवर्धनासाठी संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या उपग्रहातून येणाऱ्या फोटोंमुळे वनस्पती आणि कृषी क्षेत्रालाही मदत मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.