breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! PUBG खेळण्यावरून वडीलांनी दम भरल्याच्या रागात मुलाने विषारी कीटकनाशक पिऊन केली आत्महत्या

गुजरात: गुजरात मध्ये एका 17 वर्षीय मुलाने पबजी (PUBG) खेळण्यावरून वडीलांनी दम भरला म्हणून आत्महत्या केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील आहे. दरम्यान हा मुलगा 11वी मध्ये शिकत होता. त्याने शेतामध्ये जाऊन कीटकनाशक पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची पोलिस तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील हे शिक्षक होते.

मुलगा तासन तास मोबाईल मध्ये पबजी खेळत असल्याने त्याला ओरडा पडला होता. मात्र यानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडून शेतामध्ये गेलेला होता. तेथे त्याने विषारी कीटक नाशक प्राशन करून आपलं आयुष्य संपवलेलं आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अपघाती निधन अशी तक्रार करण्यात आलेली आहे.दरम्यान कालच केंद्र सरकारने 118 अ‍ॅप सह पबजी खेळावरही बंदी घातलेली आहे. तरूणाईमध्ये पबजीची क्रेझ आहे. अनेकांनी या खेळाच्या नादामध्ये आपला जीव गमावलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button