breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! हैदराबाद एन्काऊंटर: 2 आरोपींनी यापूर्वीही केले होते 9 बलात्कार

हैदराबाद | महाईन्यूज

तेलंगाणा येथे 27 नोव्हेंबरला झालेल्या एका महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केलेला होता. त्यानंतर पोलिसांच्या या कारवाईचं जनतेकडून कौतुक झालं तसेच काही जणांनी या एन्काऊंटरची चौकशी करण्याची मागणी केलेली होती. मात्र आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालेलं आहे असा दावा चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी 9 महिलांसोबत बलात्कार करुन त्यांना अशाचप्रकारे जाळून मारलं असल्याचं कबुली दिली होती. त्यानंतरच हैदराबाद पोलिसांनी या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार मारलं होत. सध्या साइबराबाद पोलीस आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकात तपास करत आहे. कारण यातील काही घटना तेलंगणा, कर्नाटक सीमाभागात घडलेल्या आहेत. मोहम्मद आरिफ, जे नवीन, जे शिवा आणि चेन्नाकेशवुलू यांनी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळून ठार मारलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button