breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! सुरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

सुरत |

गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. येथे एका डंपरने लहान मुलांसह 22 जणांना चिरडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना सध्या सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. हे सर्व मजूर होते आणि रात्री रस्त्याच्या कडेला फूटपाथवर झोपलेले होते. झोपेतच या मजुरांवर काळ आला आणि 15 जणांसाठी कालची रात्र अखेरची ठरलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सुरतच्या पालोद गावात घडलेली आहे. सर्व मृत हे मजूर होते. ते फूटपाथवर झोपलेले होते. त्यावेळी ऊसाचा ट्रॅक्टर आणि डंपर आमोरासमोर आले. यावेळी डंपरचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो डंपर फूटपाथवर झोपलेल्या मजुरांवर गेला. हे सर्व मजूर राजस्थानचे राहणारे असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा- मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलीस अधिकाऱ्याचा गळा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button