धक्कादायक! शेतात मिळाले 11 पाकिस्तानी शरणार्थींचे मृतदेह, हत्या केल्याचा संशय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG_20200809_152952.jpg)
जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एका शेतात 11 पाकिस्तानी शरणार्थींचे मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे. एकाच कुटुंबातील हे 11 जण असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर जिल्ह्यातील देसू पोलीस स्टेशन परिसरातील लोदटा गावात हा भयंकर प्रकार समोर आलेला आहे. या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पाकिस्तानातून विस्थापित झालेलं होतं. 11 जणांना विष दिल्याचं सांगितलं जात आहे. विषबाधेमुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून यामध्ये हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिकारी हनुमान राम यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पाकिस्तानातून आलेलं होतं. एकाच कुटुंबातील सर्वांचा विषारी वायूमुळे मृत्यू झालेला आहे. या घटनेमध्ये 6 जणांसह 5 लहान मुलांचा देखील समावेश आहे.