breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! ‘व्हॅलेन्टाईन डे’ला मारहाण झालेल्या तरुणाची माढय़ात आत्महत्या

माढा | महाईन्यूज

‘व्हॅलेन्टाईन डे’चे औचित्य साधून आपल्या ओळखीच्या मुलीला घडय़ाळ भेट देण्यासाठी तिच्या गावी गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील ढवळस येथे घडली. मनोज ज्योतिराम जबडे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात त्याचे वडील ज्योतिराम संपत जबडे (वय ४३, रा. ढवळस) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चरण शिंदे, रोहिदास सुरवसे (रा. निमगाव) यांच्यासह अन्य चारजणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे.

‘व्हॅलेन्टाईन डे’च्या पूर्वसंध्येला मनोज हा आपल्या एका ओळखीच्या मुलीला घडय़ाळ भेट देण्यासाठी निमगाव येथे गेला होता. त्याचा त्या गावात येण्याचा हेतू काही गावकऱ्यांना समजला. तेव्हा संतापलेल्या काहीजणांनी त्याला तिथेच लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली आणि त्याची बेअब्रू केली. मारहाणीत जखमी झालेल्या मनोजला पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही हल्लेखोरांनी दिली होती. त्या घटनेमुळे मनोज यास प्रचंड मन:स्ताप झाला. आपल्या गावी परत आल्यानंतर तो मानसिक तणावाखाली होता. शनिवारी सकाळी त्याने कीटकनाशक प्राशन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button