धक्कादायक! भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद
भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.
Colonel Ashutosh Sharma, Commanding Officer of 21 Rashtriya Rifles unit lost his life in an encounter yesterday with terrorists in Handwara area of Jammu and Kashmir. He had been part of several successful counter-terrorist operations in the past. pic.twitter.com/0buVlo9shj
— ANI (@ANI) May 3, 2020
शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांनी यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भुमिका बजावली होती.
Based on the intelligence input that terrorists were taking the civilian inmates of a house in Changimulla, Handwara of Kupwara district hostage, a joint operation was launched by Army and JK Police: Army Spokesperson on Handwara Operation in Jammu & Kashmir
— ANI (@ANI) May 3, 2020
कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानुसार, या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहिम राबवण्यात आली.
During the process,team was subjected to a heavy volume of fire by terrorists. In the ensuing firefight,2 terrorists were eliminated&team of 5 Army& JK personnel comprising of 2 Army officers,2 Army soldiers& 1JK Police Sub Inspector attained martyrdom: Army Spox on Handwara Op https://t.co/MmkZPa0Imj
— ANI (@ANI) May 3, 2020
हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढलं. दरम्यान, इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचा सब इन्पेक्टर असे पाच जण शहीद झाले.